Nana Patole on Devendra Fadnavis: परभणी आणि बीड घटनांवरून सरकारविरोधात प्रिविलेज मोशन आणू, पटोलेंचा इशारा

परभणी आणि बीड घटनांवरून सरकारविरोधात प्रिविलेज मोशन आणण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य मांडले.
Published by :
Team Lokshahi

न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची नेते मंडळींनी भेट घेत आहे. परभणी जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते राहुल गांधींसोबत परभणीत दाखल झाले. यानंतर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले हे देखील परभणी येथे दाखल झाले होते आणि त्यादरम्यान त्यांनी सरकारविरोधात काही वक्तव्य मांडली आहेत.

नाना पटोले म्हणाले की, परभणी आणि बीडच्या दोन्ही घटना आम्ही पहिल्यापासून विधानपरिषदेमध्ये लावून धरल्या आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी मारलं होतं, त्याच्या शरीरावरचे वळ होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, ते आजारी असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत त्यांनी विधानसभेची दिशाभूल केली आहे.

बीड आणि परभणी संबंधीत पोलिसांना आणि आरोपींना वाचवण्याचं काम यांनी केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वतीनं त्यांच्यावर प्रिविलेज मोशन आणलं जाईल. आम्ही या सरकारचं पितळ उघड केला आहे, ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना, बहुजनांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचे काम भाजप सध्या करत आहे. या सगळ्या गोष्टीचा आवाज लोकशाहीच्या पद्धतीने कॉंग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेलं. सूर्यवंशी वाकोडे कुटुंबियांच्या मागे काँग्रेस आहे, आमच्याकडून त्यांना सर्व मदत केली जाईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com