Nana Patole
Nana Patole Team Lokshahi

‘दुसऱ्यांची घरं फोडणं ही भाजपाची परंपरा’ - नाना पटोले

नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष चांगलाच नाराज झाला असल्याचे समजते.

आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या निवडणुकीत कुणाचा पराभव होणार हे ३० तारखेला मतदानाच्या दिवशी ठरेल. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल २ फेब्रुवारी रोजी लागणार आहे, यासर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, नाशिकमध्ये त्यांना स्वतःचा उमेदवार मिळू नये, यावरुन भाजपाची काय स्थिती झाली, हे लक्षात येतं. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सुशिक्षित लोक मतदान करत असतात. राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. सुशिक्षित लोक मतदानातून याबाबत भाजपाला उत्तर देतील.”“भाजपाने घर फोडण्याचं काम केलं आहे. घर फोडणं ही त्यांची आता परंपराच झाली आहे.

असे म्हणत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com