संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद करावी ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही - नाना पटोले
Admin

संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद करावी ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही - नाना पटोले

संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद करावी ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही

कल्पना नळसकर- असूर, नागपूर

संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षातील निर्णय हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेत नसून राहुल गांधी घेत असल्याचा वक्तव्य केलं होतं. याचा खरपूस समाचार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला. संजय राऊत यांनी चोमडेगिरी करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही अशा शब्दात नाना पटोले यांनी सुनावले.

पहाटेचा सरकार कोसळल्यानंतर संपूर्ण देशाला माहित आहे. उद्धव ठाकरेंनी शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेतली त्यावर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी चर्चा करून निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी तो निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचा कर्ज माफ एका वर्षात झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही त्यांनी ठेवली होती हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता.

शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांनी पुस्तकात काही लिहिलं असेल तरी त्यावर आम्ही सध्या प्रतिक्रिया देणार नाही मात्र योग्य वेळी यावर उत्तर देऊ.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com