सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले; नरेंद्र मोदींनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे
Admin

सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले; नरेंद्र मोदींनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे नेहमी काहीना काही त्यांच्या विधानाने चर्चेत असतात.

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे नेहमी काहीना काही त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही विधान केलं आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींविषयी एक गौप्यस्फोट केला आहे.

पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले. गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत राग नाही. मोदी सरकारच्या चुकीमुळे हा हल्ला झाला. असे मलिक म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात नरेंद्र मोदींची जी असंवेदनशील भूमिका स्पष्ट केलेली आहे ती घातक असून नरेंद्र मोदींनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.

सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले; नरेंद्र मोदींनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे
मोदी सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला; मोदींनी त्यावेळी गप्प राहण्यास सांगितले; सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com