Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नाही; नाना पटोले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 जानेवारीला मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 जानेवारीला मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.

यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नाही असे नाना पटोले म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो. जे लोक पहाटेच्या सत्तेत होते त्यांनाच विचारा. महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच हा प्रश्न विचारा, राज्यात फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पहाटेला स्थापन झाले होते. असे विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com