उद्धव ठाकरे यांची 'ती' विशेष आणि मोठी खुर्ची जाणार; नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले
Admin

उद्धव ठाकरे यांची 'ती' विशेष आणि मोठी खुर्ची जाणार; नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले

राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत.

राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये होत आहे.

याच पार्श्वभूमीवर एका माध्यमाशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सभेत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांची भाषणं होणार आहेत. उद्याच्या सभेत मी जाणार आहे. नागपुरातील वज्रमुठ सभा जोरात हेणार आहे. असे नाना पटोले म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, नागपूरातील वज्रमुठ सभेत सर्वांच्या खुर्च्या सारख्या असतील. इतर नेत्यांनी जी खुर्ची असेल तीच उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांना जी खुर्ची असेल तीच खुर्ची सर्वांना असेल. असे नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com