ताज्या बातम्या
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांनी गाठली धोक्याची पातळी
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
कमलाकर बिरादार, नांदेड
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील अनेक सखल भागात पावसाचं पाणी शिरलं आहे. नांदेड शहरालगत असलेल्या असना नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
नांदेडमध्ये पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पुराचे पाणी शेती शिवारात शिरले आहे.
नांदेड जिल्ह्याला मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)