नंदुरबार पोलिसांनी जोपासली  माणुसकी....

नंदुरबार पोलिसांनी जोपासली माणुसकी....

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रात्री नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होती.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रात्री नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नंदुरबार शहरातील अनेक भागात तसेच रेल्वे स्टेशन व बस स्टैंड वर भिकारी आणि बेघर वस्ती मध्ये थंडीत उघड्यावर झोपण्याची दिसून आले थंडीपासून बचावासाठी त्यांच्याकडे काही नसल्याने अशा गरजूंना पोलिसांनी रात्रीच्या रात्री ब्लॅंकेट वाटप करत मायेची उब दिली.

नूतन वर्षाचा पूर्वसंध्येला नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष अभियान राबविले जात असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक पी आर पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरात विशेष मोहीम राबवली जात असताना त्यांना कडाक्याच्या थंडीत अनेक जण उघड्यावर झोपल्याचे दिसून आले त्यांच्याकडे थंडीपासून बचावासाठी काही साधनं नव्हती हे लक्षात येतात पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देत या गरजूंसाठी इतक्या रात्री ब्लॅंकेट उपलब्ध करून देत कडाक्याच्या थंडीत त्यांना मायेची उब दिली नंदुरबार पोलिसांची माणुसकी यातून दिसून येत आहे. नववर्षाचा पूर्व संध्येला भिकारी आणि बेघर लोकांना नंदुरबार पोलिसांनी दिलेल्या आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या भेटीची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com