ताज्या बातम्या
चक्क नंदूरबारमध्ये आला जपान देश; सार्वजनिक बांधकाम विभागाची कमाल
नंदूरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठी कमालच केली आहे.
नंदूरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठी कमालच केली आहे. चक्क नंदूरबारमध्ये जपान देश अवतरल्याचे पाहायला मिळत आहे. नंदूरबार जिल्ह्यात 'जपान' हे गाव नसून 'जमाना' हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकीचे लिहिण्यात आले आहे.
दिशादर्शक फलकामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जपान नावाचं गाव असल्याचा फलक लावण्यात आला आहे.बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे.फलकावर एकूण सहा गावांची नावे लिहिली आहेत. डाब, तोडीकुंड, चिवलउतार, खुंटगव्हाण, ओरपाफाटा आणि जपान असं या फलकावर लिहिलं गेले आहे.
यामुळे आता नंदूरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे.