Nandurbar tractor showroom fire
Nandurbar tractor showroom fire

Nandurbar Fire : ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग,20 पेक्षा जास्त वाहनं जळून खाक

या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचे कळतेय.

नंदुरबार : प्रशांत जावेरी | शहादा शहरातील राज मोटर्स या आयशर ट्रॅक्टरच्या शोरूम ला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत वीस पेक्षा अधिक ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे .

शोरूम ला लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर आज संपूर्ण परिसरात पसरली शोरूम आणि परिसरात लावलेली ट्रॅक्टर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. राज मोटर्स हे शोरूम पूर्ण जळून गेल्याने इतर महत्वाच्या साहित्याचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आले नसले तरी स्थानिक नागरिक आणि शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने पहाटे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. आगीत कोट्यावधी रुपयाचा साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com