Narayan Rane Exclusive: "पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उद्धव ठाकरेंचे समीकरण" नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, नारायण राणेंचा आरोप
Published by :
Riddhi Vanne

लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या कार्यक्रमामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे उपस्थितीत होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

पहिली शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यामधला फरक त्यांनी सांगितला, त्यावेळेस नारायण राणे म्हणाले की, "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही. गेल्या 45 वर्षात बाळासाहेबांनी कमावले ते अडीज वर्षात उद्धव ठाकरेंनी गमावले आहे. खरी शिवसेना अस्तित्वातच राहिली नाही, साहेबांचे आचार, विचार, कार्यकर्त्यांसोबत असलेली माणूसकी ही धमक उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे समीकरण सध्या उद्धव ठाकरे यांचे आहे. महापालिका निवडणुकांमध्ये बंधूची जुळवा असो, किंवा अजून काही असू असे उद्धव ठाकरेंचे धोरण आहे. दोन बंधू एकत्र येणे चांगली गोष्ट आहे, त्यावर मी भाष्य करु शकत नाही. हे बंधू प्रेमापोटी येतात की, महापालिकेची खुर्ची पाहून येतात माहिती नाही. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदरात काय पडले, आता महापालिकेमध्ये काय पडणार आहे?.'

दरम्यान त्यांनी अनेक मुद्यांवर नारायण राणे बोलले आहे, ते पाहूयात व्हिडिओच्या माध्यमांतून

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com