ताज्या बातम्या
Narayan Rane On Nitesh Rane: "बाप म्हणणं चुकीचे", नारायण राणेंनी आपल्या मुलांचे कान टोचले
नारायण राणे: नितेश राणेंच्या 'बाप' वक्तव्यावर नारायण राणेंची कान टोचणी. मुख्यमंत्र्याचे पद कोणाचे बाप नसते, नारायण राणेंचे स्पष्ट मत.
काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विधान करताना, "ते सर्वांचे बाप आहेत म्हणून ते मुख्यमंत्री आहे", असे वक्तव्य केले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणे यांना समज दिली. त्यांच्या पाठोपाठ आता नारायण राणे यांनी देखील आपल्याच मुलाचे कान टोचले आहेत. "मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो. नितेश राणे याने केलेलं वक्तव्य हे चुकीचं ...", नारायण राणेंचं वक्तव्य आहे.
पुढे नारायण राणे म्हणाले की, "मी स्वत: मुख्यमंत्री होतो. त्यावेळी जर कोणी मला साहेब म्हटले, तर मी त्यांना सांगत होतो की, मला साहेब नका बोलू, मी जनतेचा सेवक आहे." असे नारायण नाही यांनी म्हटले आहे.