Narayan Rane On Refinery: कोकणकरांसाठी मोठी बातमी; रिफायनरी प्रकल्पाबाबत नारायण राणेंचा मोठा निर्णय

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत नारायण राणेंचा मोठा निर्णय, नाणार प्रकल्प होणार असल्याची शक्यता. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत घोषणा.
Published by :
Team Lokshahi

कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी इथे नारायण राणे यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येते.

कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना, नारायण राणे यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. शिवाय नारायण राणे यांनी बारसु रिफायनरी ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनीही नाणार प्रकरणावरुन मोठं वक्तव्य केलंय.

याचपार्श्वभूमीवर नारायण राणे म्हणाले की, अजून मी त्याच्याबद्दल कोणासोबत काहीही बोललो नाही....आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत मी पेट्रोलिंग मिनिस्टर आहे. कंपनीचं जे काम आहे ते मी 100 टक्के सांगतो कंपन्या रत्नागिरीमध्ये नक्की येणार... तर पुढे उदय सामंत म्हणाले की, या संदर्भात नारायण राणे यांच्यासोबत चर्चा करण्याची वेळ आली तर मी नक्की चर्चा करणार आहे....मी नारायण राणे, मुख्यमंत्री फडणवीस आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com