Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या
"संपादक म्हणून आला अन्..."; नारायण राणेंची टीका
संजय राऊतांचा तोल ढासळला असल्यानं ते अशी भाषा वापरत असल्याचं म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी आज संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या अर्वाच्य भाषेवरून नारायण राणेंनी निशाणा साधला. हातात सामानची प्रत घेऊन त्यांनी "पत्रकारिता हा पेशा आहे, धंदा नाही असं म्हटलं आहे. तसंच सामनाच्या काही बातम्यांवरून देखील त्यांनी भाष्य केलं.
गली-गली मे शोर है...किरीट सोमय्यांचं नाव लिहून ते चोर आहे असं म्हटलं आहे. विक्रांतच्या नावावर कोट्यवधींची लूट केली म्हणत जनता रस्त्यावर उतरल्याचं म्हटलंय. मात्र चाळीस बसेस सोडून कोणीही नव्हतं असं नारायण राणे म्हणाले. तसंच संजय राऊत हे संपादक म्हणून आलेले पगारी नेते असल्याची टीका केली. आपण कोण आहोत? कोणत्या पक्षात आहोत? आपल्या पक्षाचा विचार केलाय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.