Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मला 2 फोन केले, दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट
दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यादरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आल्याचा दावा राणेंनी केला आहे. तर त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.
पहिला फोन आला त्यामगचं कारण काय?
नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी दोन फोन केले हे खरं आहे. त्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून घरी चाललो होतो जुहूला, तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर फोन आला. मिलिंद नार्वेकर यांचा फोन होता. त्यावेळेस ते म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं, कोण दादा साहेब? तर ते म्हणाले, उद्धवजी, त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालवत आहेत, त्यांना बोलायचं आहे. मी म्हटलं, द्या. मी तुम्हाला सुरुवात सांगतो मी त्यांना म्हटलं जय महाराष्ट्र साहेब बोला असं मी सुरुवातीला म्हणालो. तर ते म्हणाले तुम्ही अजून जय महाराष्ट्र म्हणता, मी म्हणालो, मरेपर्यंत म्हणार. माझं उत्तर रोखठोक असतं तुम्हाला तर माहित असेल", असं नारायण राणे म्हणाले.
पुढे नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे म्हणाले, नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला. मी म्हटलं, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे म्हणतोय, आणि त्याच्यात जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे ही म्हणतोय".
"त्यात तर तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, तो संध्याकाळी जिथे जातो, त्याला तिथं जाण्यापासून सांभाळा. त्याला सांगा ते बरं नाही. माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो. तिथे हे लोक काय साडे तीन चार तास जमतात आणि धुमाकूळ घालतात. मला माहीत नाही. मला माहीत आहे, पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. उद्धव ठाकरे म्हणाले, साहेब मी पाहतो, सांगतो. पण तुम्ही तेवढं सहकार्य करा. मी म्हणालो, ठिक आहे. त्यानंतर त्यांनी फोन ठेवला", असं राणेंनी सांगितलं आहे.
दुसरा फोन हा राणेंनी ठाकरेंना केला
पुढे नारायण राणे म्हणाले की, "दुसरा फोन जेव्हा कोविड होता त्या काळात आला होता. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. त्यावेळी माझी राज्य सरकारकडे एक परवानगी होती. केंद्रच परवानगी देत सगळ्या हॉस्पिटला आणि मेडिकल कॉलेजला. त्यामुळे तेव्हा त्यांना फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही फोन केला होता. मी म्हटलो हो, कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. उद्धव म्हणाले, साहेब ते तर मिळेलच. पण तुम्हाला सांगतो जरा तुम्ही, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता तसा मी उल्लेख केला नाही. पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. हे दोन फोन त्यांनी केले", असं राणे यांनी म्हटलं आहे.