Chhattisgarh
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Chhattisgarh) छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.नारायणपूर येथील अबुझमद प्रदेशातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी कारवाईला सुरुवात केली.

या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दुपारपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अद्याप सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळाहून एके-47/एसएलआर रायफल, इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com