Narendra Modi On Budget 2025: भारत मिशन मोडमध्ये, अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होणार; पंतप्रधान मोदी
आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे, तर आज केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील, आणि उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांच्या तिसर्या कार्यकाळातील संपुर्ण अर्थसंकल्प सादर होत आहे. पंतप्रधान मोदींनी लक्ष्मीला वंदन करत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी महिला वर्गासाठी आवश्यक निर्णय होणार, स्वतंत्र्याच्या 100 व्या काळात भारत पुर्ण विकसित होणार, बेरोजगारीवर तोडगा काढला जाणार अशा अनेक विषयांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला वंदन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल, असं म्हणत मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. पुढे मोदी म्हणाले की,गेल्या काही वर्षात महागाईने हा मध्यम वर्गाची मोठ्या प्रमाणात ओढाताण झाली. त्यातच करांचे ओझे कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
येणाऱ्या तिसऱ्या कार्यकाळात सरकारचे मिशन मोडवर आहे. सर्वांचा विकास हेच आपल्या सरकारचे मिशन असल्याचे मोदी म्हणाले. स्वतंत्र्याच्या 100 व्या काळात म्हणजे 2047 मध्ये विकसीत भारताचा संकल्प पूर्ण विकसित होईल. नाविन्य हीच आपल्या आर्थिक धोरणांचा आधार आहे. सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मवर लक्ष्य देत असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेटमध्ये विकसीत भारताचा चेहरा दिसले, असा विश्वास व्यक्त केला.