पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला नव्या संसद भवनाचा व्हिडीओ; कशी आहे नवी संसद पाहा?
Admin

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला नव्या संसद भवनाचा व्हिडीओ; कशी आहे नवी संसद पाहा?

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष आणि सभापतींच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. तब्बल ८८८ सदस्य बसण्याची क्षमता असणारं हे भव्य सभागृह आहे. संसदेच्या इमारच्या भव्य प्रवेशद्वारावर ‘सत्यमेव जयते’लिहिण्यात आले आहे.

तसेच लोकसभेतील हिरव्या रंगाचं कारपेट न ठेवता त्या कारपेटवर नक्षीकाम करण्यात आले आहे. तर राज्यसभेप्रमाणे फक्त लाल रंगाचं कारपेट न टाकता नक्षीकाम करण्यात आले आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेचीही रचना असून याची सदस्य बसण्याची क्षमता ३०० इतकी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com