केंद्राने उघडले धान्याचे कोठार ; मोदी सरकारने मोफत रेशन देण्याचा घेतला मोठा निर्णय

केंद्राने उघडले धान्याचे कोठार ; मोदी सरकारने मोफत रेशन देण्याचा घेतला मोठा निर्णय

केंद्रातील मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेत देशातील गोरगरिबांना नववर्षाची भेट दिली आहे.

केंद्रातील मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेत देशातील गोरगरिबांना नववर्षाची भेट दिली आहे.दोन वेळच्या अन्नासाठी गधा हमाली करणाऱ्यांना आता ढोर मेहनत करावी लागणार नाही. देशातील प्रत्येक गरिबाला आता वर्षभर मोफत रेशन मिळणार आहे. शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर याबाबतची माहिती दिली.या कायद्यांतर्गत गरिबांना 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू मिळतात. केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत अन्न देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 31 डिसेंबर रोजी ही योजना बंद होत आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या 81.35 कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिलं जातं.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशातील 80 कोटी जनतेला मोफत अन्न देण्यात येणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. त्यासाठी गरिबांना एक दमडीही खर्च करावी लागणार नाही. मात्र, मोफत रेशन देण्यासाठी केंद्र सरकारला वर्षाला दोन लाख कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com