Narendra Modi's 74th Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 74वा वाढदिवस! | Lokshahi Marathi
दर महिन्याच्या अखेरीला मन की बात या कार्यक्रमातून देशातील घरोघरी पोहचून संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आपण देशात अनेक चांगले बदल पाहिले. डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया अशा अनेक अभियानामधून आपण आपल्या देशाची यशस्वी वाटचाल पाहिली. तसेच देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरांवर देशाची प्रतिमा झळकवणे देशाची आंतरराष्ट्रीय धोरणे सुरक्षाव्यवस्था मजबूत होताना आपण पाहिली आहे.
भारताची प्राचीनयोग पद्धत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरुवात केली. नोटबंदी, ट्रीपल तलाक, कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक, बॅंक मर्जर, जीएसटी यांसारखे अनेक ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले. तसेच संपूर्ण देशात समान नागरिक कायदा राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचसोबत देशात पायाभूत सुविधांचा विकास तसेच डिजिटल साक्षर्तेवर भर दिला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट, प्रत्येक नागरिकांसाठी मुलभूत सुविधा पोहचवणे. तरुणांच्या कौशल्य विकासासाठी स्कील इंडियाचा उपक्रमामुळे तरुणांना रोजगार उपक्रमामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले. आवास योजनेअंतर्गत गरजूंना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून दिले.