अजित पवार यांचा पुतळा जाळा, जोडे मारा, जितेंद्र आव्हाड यांचा फोन; शिंदे गटाच्या 'या' नेत्याने केला गौप्यस्फोट

अजित पवार यांचा पुतळा जाळा, जोडे मारा, जितेंद्र आव्हाड यांचा फोन; शिंदे गटाच्या 'या' नेत्याने केला गौप्यस्फोट

शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यावर आरोप केले आहेत. नरेश म्हस्के यांनी सांगितले की, : जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा जाळून टाकण्यास सांगितलं होतं. अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारा असं आम्हाला फोनवरून सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीनेच अजितदादांच्या बदनामीचा कट रचला होता. असा धक्कादायक गौप्यस्फोट मस्के यांनी केला आहे.

याचबरोबर त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखिल हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान झालं आहे. संतापलेले शिवसैनिकच एक दिवस संजय राऊत यांना चोपून काढतील. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी गुंडांवर बोलूच नये. त्यांच्यासोबत फक्त तेच लोक फिरतात. असे नरेश मस्के म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com