Sunita Williams :सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास, अंतराळयान लॅंडिंगचे थेट प्रेक्षपण पाहता येणार
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्यांची ही मोहिम नऊ महिन्यापर्यंत लांबली. अवकाशात नऊ महिने घालवल्यानंतर, सुनीता विल्यम्स यांचा अखेर परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यांना 'ड्रॅगन कॅप्सूल' अंतराळयान पृथ्वीवर घेऊन येत आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी हे यान पृथ्वीवर उतरेल. या अंतराळयानचे लॅंडिंगचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळयान हे स्पेस स्थानकावरुन यशस्वीरित्या निघाले आहे. ज्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास हा 17 तासांचा असेल. ते18 मार्चला सकाळी 10.35 वाजता अवकाशातून निघाले होते. हार्मनी मॉड्यूलवरील स्टेशनच्या पुढील बाजूच्या पोर्टपासून ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाले. ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना, 19 मार्च रोजी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांची वाजता अटलांटिक महासागरात सुरक्षित लॅंडिंगसाठी त्याचे पॅराशूट तैनात करण्यात येणार आहे. परंतू तैनात होण्यापुर्वी दोन्ही अंतराळवीरांना तीव्र उष्णता सहन करावी लागेल.