नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच - काँग्रेस नेते नाना पटोले
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत.
याच अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, राज्यातील रस्ते खराब आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अपघात होतात. नाशिकचा अपघातही खड्ड्यांमुळेच झाला आहे, असे मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस यवतमाळकडून मुंबईकडे जात होती. या बसची एका ट्रकला धडक लागल्यामुळं आग लागली. बसने पेट घेतल्यानं त्यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला.