Deepak Pandey
Deepak PandeyTeam Lokshahi

Nashik : दीपक पांडेंना गृहविभागाची नोटीस; 'ते' पत्र भोवणार?

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना गृहविभागाने नोटीस बजावली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

नाशिकचे (Nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना गृहविभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दीपक पांडे यांनी महसुल विभागाबाबत लिहिलेल्या पत्रावरुन दीपक पांडे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे आता दीपक पांडे (Dipak Pandey) यांच्या अडचणीत वाढ होण्याची आहे. दरम्यान, दीपक पांडे हे आज संजय राऊत यांच्याकडेही गेल्याचं समजतंय.

Deepak Pandey
सोमय्यांनी नाकात दम केला असताना माजी सेना खासदार म्हणतो..,'किरीट सोमय्या मला घाबरतो'

दीपक पांडे यांनी महसुल विभागाबाबत त्यांनी लिहिलेल्या या पत्राबद्दल मंत्रीमंडळ बैठकीत पडसाद पाहायला मिळाले. अजित पवार यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची सुद्धा चर्चा आहे. शासनाच्या स्तरावर यावर विचार व्हावा यासाठीच हे पत्र लिहिण्यात आलं होतं, त्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे हे दीपक पांडे म्हणाले.

Deepak Pandey
"... पाहतो कोण येतो आडवाया"; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

संजय राऊत यांच्या भेटीबद्दल विचारले असता आमची भेट होत असते. त्यातच ठाण्यावरुन जाताना त्यांचं घर होतं त्यामुळे आपण त्यांना भेटलो असं दीपक पांडे म्हणाले. तसंच आपण हे पत्र फार अभ्यास करुन लिहिलं असून, आपण या पत्रावर ठाम आहोत असं दीपक पांडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com