Nashik Crime
Nashik CrimeTeam Lokshahi

नाशकात ड्रिंक अँड ड्राइव्हचा प्रकार; मद्यधुंद वाहनचालकाने सात ते आठ जणांना उडवलं

नाशकात मद्यधुंद कारचालकाने वेगानं गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली.

महेश महाले: नाशिक | नाशिकमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. नाशकात (Nashik) मद्यधुंद कारचालकाने वेगानं गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली. इतकंच नाही तर त्याने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना सुद्धा चिरडलं या गंभीर अपघातामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Nashik Crime
मोठी बातमी! एकनाथ खडसे देखील गुवाहाटीला जाणार

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार सांयकाळी सुमारास घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत वेगाने गाडी चालवणारा वाहनचालक शिक्षक असल्याची माहिती आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक कारचालक नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरातून येत होता. तो अतिशय भरधाव वेगाने कार चालवित होता.

या महामार्गावर त्याने काही वाहनांना धडक दिली. या अपघातात काही जण जखमी झाले. दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी या कारचालकाला थांबवून त्याला कारबाहेर खेचले. सदरील कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com