Nashik Crime : पाठलाग, शरीरसुखाची मागणी, लॉजवर नेऊन अत्याचार आणि...; पोलिसाविरोधातच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत प्रेमसंबंध ठेवले आणि अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता नाशिक पोलिस शहर दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात इंदिरानगर पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
यादरम्यान इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संशयित चंद्रकांत उर्फ अभी शंकर दळवी, वय 35 वर्ष, केतकीनगर, म्हसरूळ, याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संशयिताने पीडितेचा छळ केला. 2020 ते मे 2025 या कालावधीमध्ये पीडितेचा छळ करुन बलात्कार केला. त्याने राणेनगर येथील कशिश लॉज, सातपूर येथील सिटाडेल, डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेने 15 मे रोजी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
संशयिताने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक संबंध ठेवले. 15 फेब्रुवारी 2024 रोजी पीडितेने दुसऱ्या व्यक्तिसोबत विवाह करून तिचा संसार व्यवस्थित सुरू असताना संशयिताने पीडितेसह तिच्या पतीचा अपघात करून जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान 15 फेब्रुवारी 2024 रोजी पीडितेने दुसऱ्या व्यक्तिसोबत विवाह करून तिचा संसार व्यवस्थित सुरू असताना संशयिताने पीडितेसह तिच्या पतीचा अपघात करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर पुन्हा पीडितेकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा पाठलाग करीत बळजबरीने इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.