नाशिक-गुजरात हायवेवरील सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात, 200 फूट दरीत कोसळून 7 जण जागीच ठार

नाशिक-गुजरात हायवेवरील सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात, 200 फूट दरीत कोसळून 7 जण जागीच ठार

नाशिक-गुजरात हायवेवरील सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात, 200 फूट दरीत कोसळून 7 जण जागीच ठार, 15 जण गंभीर जखमी.
Published by :
shweta walge
Published on

नाशिक-गुजरात हायवेवरील सापुतारा घाटात एका खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस 200 फूट दरीत कोसळली आहे. हा अपघात पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान झाला. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात इतका भीषण होता की बस घाटात कोसळल्याने दोन तुकडे झाले. नाशिकहून देवदर्शनासाठी निघालेली बस गुजरातकडे जात असताना हा अपघात झाला. मयत आणि जखमी सर्व व्यक्ती मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com