नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ

नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ

नाशिक शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

नाशिक शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला मतमोजणीची छाननी करण्यात येत आहे. यावेळी ही मतमोजणीची प्रक्रिया सुरु असताना गोंधळ उडाला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. छाननीमध्ये 3 मतपत्रिका जास्त आढळल्याने गोंधळ झाल्याची माहिती मिळत आहे. 22 नंबरच्या टेबलवर नोंदीपेक्षा 3 मतपत्रिका अधिक असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर टेबलवर नोंदीपेक्षा 3 मतपत्रिका अधिक आढळल्याने ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे. प्रशासनाने याची लागलीच दखल घेत त्या मतपत्रिका बाजूला ठेवल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com