Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; भरधाव कार थेट बंगल्यात घुसली, पाच जणांचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; भरधाव कार थेट बंगल्यात घुसली, पाच जणांचा मृत्यू

भीषण अपघात: नाशिकमध्ये कार बंगल्यात घुसली, पाच जण ठार जखमी
Published by :
Team Lokshahi
Published on

नाशिक कळवण महामार्गावर एक धक्का देणारी घटना घडली आहे'. नाशिक-कळवण मार्गावरील कोल्हापूर फाटा येथे भरधाव कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात शिरल्याने भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार थेट बंगल्यात घुसली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. जखमींना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

भदाण आणि मेतकर कुटुंबियांवर काल काळाने घाला घातला. नाशिकमध्ये एका लग्नसमारंभानंतर हे कुटुंब परत येत होते. त्याचवेळेस बुधवारी रात्री 10 वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा गावातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे . तर दोन जण गंभीर जखमी झाले. जनामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्या लग्नसमारंभासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते.

लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने ती कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली.हा अपघात इतका भीषण होता की बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. यावरून अपघाताची भीषणता लक्षात येईल.

भदाण आणि मेतकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

या भीषण अपघातात चालकासह भदाण, मेतकर कुटुंबातील पाच जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात चालक खालिक मेहमूद पठाण (50) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (32) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (04) रा. देवळा, शैला वसंत भदाण (62) आणि त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (50) हे जागीच ठार झाले. तर उत्कर्ष मेतकर (12) रा. देवळा आणि भालचंद्र भदाण (52) रा. नामपूर हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर सुरुवातीला कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शैला भदाण आणि माधवी मेतकर या दोघी मायलेकी होत्या तर त्रिवेणी ही माधवीची मुलगी होती. या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com