Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये भररस्त्यात साधुची हत्या, धक्कादायक CCTV समोर

त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या हत्येने वातावरण तापले, सीसीटीव्ही पुरावे पोलिसांकडे सादर
Published by :
Team Lokshahi

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. याचदरम्यान, या त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात साधूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराच्या मारहाणीनंतर ५२ वर्षीय साधूचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने महंत संतप्त झाले आहेत. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले आहेत. नशेखोरांच्या मारहाण संबंधित साधूचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील दारू दुकाने बंद करण्याची मागणी साधू-महंतांकडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com