नाशिकमध्ये तरुणाला इन्स्टाग्रामवर रील बनवणं पडलं महागात
Admin

नाशिकमध्ये तरुणाला इन्स्टाग्रामवर रील बनवणं पडलं महागात

इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमध्ये एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.आहे..

महेश महाले, नाशिक

इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमध्ये एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मिडियाचे भूत डोक्यावर चढलेल्या नाशिकमधील एका तरुणाने हातात तलवार घेऊन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवले आणि हा व्हिडिओ नाशिकच्या गुन्हे शाखेच्या हाती लागला आणि इन्स्टाग्रामवर तलवार घेऊन रिल्स बनवणाऱ्या त्या तरुणाच सोशल मीडियाच डोक्यावर चढलेल भूत पोलीसांनी उतरवलं.

भारत नगर येथे राहणारा १९ वर्षीय संशयित फैजान नईम शेख याने इन्स्टाग्रामवर हातात धार धार तलवार घेऊन त्याचा रिल्स बनवत हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर अपलोड केला. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी माहिती काढत भारत नगर इथे राहणाऱ्या फैजान शेख चा शोध घेत त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार हस्तगत केली.

तलवार बाबत अधिक चौकशी केली असता त्याने ही तलवार संशयित भारत नगर येथेच राहणारा संशयित सचिन शरद इंगोले याच्याकडून घेतल्याचे कबूल केले, त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन भारत नगर इथून फैजान नईम शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com