ताज्या बातम्या
Women's Day Special Report : नाशिकच्या सासुला 2 सुनांची साथ; गुलकंद व्यवसाय पोहोचला थेट दुबईत..!
नाशिकच्या सासू-सुनांनी गुलकंदाच्या व्यवसायात केलेली क्रांती, आता दुबईतही पोहोचली. जाणून घ्या त्यांच्या यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने.
नाशिकमध्ये एक सासू आणि तिच्या दोन सुनांनी अशी कामगिरी केली आहे की, त्यांच नाव आता देशातच नव्हे तर सातासमुद्रा पार पोहचल आहे. गुलाबाच्या तीन झाडांपासून सुरु केलेला त्यांचा गुलकंदाचा व्यवसाय आता तब्बल पाच हजारांपर्यंत पोहचला आहे. या सासू सुनांनी बनवलेला गुलकंद आता अमेरिकेसह दुबईत देखील निर्यात होत आहे. म्हणूनच भारतातल्या नारी शक्तीची परदेशापर्यंत पोहचलेली ही किमीया पाहा लोकशाही मराठीवर