ताज्या बातम्या
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ 10 दिवसात होणार सुरू...
बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या 10 दिवसांत सुरू होणार असल्याने मुंबई महानगरातील हवाई प्रवासाला नवे वळण मिळणार आहे.
बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या 10 दिवसांत सुरू होणार असल्याने मुंबई महानगरातील हवाई प्रवासाला नवे वळण मिळणार आहे. मात्र उद्घाटनाआधीच विमानतळावरील तिकिटांचे दर मुंबई विमानतळाच्या तुलनेत अधिक असल्याचं उघड झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील विमानतिकिटांमध्ये लक्षणीय तफावत असल्याने प्रवासी आणि उद्योगजगतामध्ये नाराजीचा सूर आहे. ‘नवीन विमानतळ प्रवाशांसाठी स्वस्त ठरेल’ या अपेक्षांना धक्का बसला असून, दोन्ही विमानतळांचे तिकिट दर समान असावेत यासाठी सरकार आणि संबंधित यंत्रणांवर दबाव वाढताना दिसतोय.
नवी मुंबई विमानतळ सुरू होत असताना तिकिट दरांचा प्रश्न सरकार कसा सोडवणार, प्रवाशांना दिलासा मिळणार की नाही, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
