Navi Mumbai Fire breaks out in Vashi APMC Fruit market
Navi Mumbai Fire breaks out in Vashi APMC Fruit marketTeam Lokshahi

नवी मुंबईत एपीएमसीफळ मार्केटला भीषण आग

नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. एपीएमसी फळ मार्केटमध्ये हा अग्नीतांडव सुरू आहे.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Navi Mumbai Fire breaks out in Vashi APMC Fruit market
शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यात महिला भयमुक्त, चित्रा वाघ यांनी यादीच वाचून दाखवली...

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी फळ मार्केटला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. सदर आग एपीएमसीतील एनरोला ही आग लागली आहे. एन विभागातील सात ते आठ विंगमध्ये आग पोहोचली आहे. फळ ठेवण्यासाठी असणारे पुट्ठे जळून खाक झाले आहेत.

नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन अग्निबंब पोहोचले आहेत. अग्निशमन दलाचे जवानांचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com