Navneet Rana : काही भाऊ आमचे इथं आहेत जे सुपारी घेतात कोणालातरी पाडण्यासाठी

दहीहंडी सोहळ्यात नवनीत राणा यांनी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

दहीहंडी सोहळ्यात नवनीत राणा यांनी संवाद साधला. नवनीत राणा म्हणाल्या की, काही भाऊ आमचे इथं आहेत जे सुपारी घेतात कोणालातरी पाडण्यासाठी. तोडी बहाद्दूर, ब्लॅकमेलर, ढोंगी नाटक करणारा तोडी बहाद्दर कोण, ब्लॅकमेलर कोण, ढोंगी नाटक करणारा कोण? मला पाडण्यासाठी सुपारी घेतली होती.

मी माझ्या भावांना एक विनंती करते की आज मी हरले नाही, माझा जिल्हा 10 वर्ष मागे गेला आहे. तोडी बहाद्दूरला, 20 वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतंय. जेवेढे मुलं इथं उभे आहेत एकाने मला सांगून द्या. त्या तोडी बहाद्दूरनी तुम्हाला रोजगार दिला का? असे नवनीत राणा म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com