नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश

नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी नवनीत राणा यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा तीव्र विरोध असताना तसेच नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्याने महायुतीमधील घटक पक्षांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com