अमरावतीत राणा दाम्पत्यांचा पतंग महोत्सव

अमरावतीत राणा दाम्पत्यांचा पतंग महोत्सव

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त पतंग महोत्सवाचे अमरावती शहरातील बेलपुरा भागातील न्यू हायस्कुल मैदानात आयोजन करण्यात आले होते
Published by :
Siddhi Naringrekar

सुरज दहाट, अमरावती

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त पतंग महोत्सवाचे अमरावती शहरातील बेलपुरा भागातील न्यू हायस्कुल मैदानात आयोजन करण्यात आले होते यावेळी असून या पतंग महोत्सवात लहान मुलांना पंतगीचे वाटप करण्यात आले.तर यावेळी आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही पतंग उडवून महोत्सवाला सुरवात केली.यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या दोन मोठी पतंग सुद्धा यावेळी उडविण्यात आल्या त्यावर एक आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे नाव लिहलेल्या पतंग उडविण्यात आल्या.

आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना पतंगच्या माध्यमातून संदेश दिला त्यांनी आता तरी हनुमान चालीसा वाचावी.त्यांनी जो हनुमान चालीसा व राम भक्ताचा विरोध केला त्यामुळे तुमची ही दशा झाली. तुमच्या मधला जो अहंकार आहे तो संपवण्याचा काम सच्चा शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे आता तरी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचावं असा आव्हान आमदार रवी राणा यांनी केलं

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com