Ravi Rana - Navneet RanaTeam Lokshahi
ताज्या बातम्या
Breaking : नवनीत राणांच्या तक्रारीची दखल; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदीय समितीची नोटीस
मुंबई | सुमेध साळवे :
नवनीत राणांच्या (Navneet Rana) तक्रारीची संसदेच्या समितीकडून दखल घेण्यात आली आहे. पोलीस महासंचालक आणि मुंबई पो.आयुक्तांना याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच भायखळ्याच्या कारागृह अधीक्षकांना संसदीय समितीची नोटीस आली आहे. 15 जून रोजी तोंडी पुराव्यासाठी हजर राहण्याचे आदेश संसदीय समितीने दिले आहेत. लोकसभेच्या विशेषाधिकार व आचार समितीने ही नोटीस बजावली आहे. संजय पांडे, रजनीश सेठ यांना संसदीय समितीची ही नोटीस आली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही नोटीस आली आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. (Parliamentary Committee Notice To Mumbai Police)