राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, आता त्यांनी विरोध केला की नाही मला माहित नाही. आता त्यांना त्यांच्या एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग का आहे? आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्हांमध्ये कसे अडकवण्यात आलं. हे सगळं रेकॉर्डवरती आहे. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com