नवाब मलिकांचा मुलगा अडचणीत! फराज मलिकांविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

नवाब मलिकांचा मुलगा अडचणीत! फराज मलिकांविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत दिली आहे.

नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत दिली आहे. फराज मलिक यांची दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचं नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि दावा असा आहे की, फराज मलिक यांना भेटण्यासाठी लॉराने ज्या फ्रेंच नॅशनल आहेत. भारतीय व्हिसासाठी त्यांनी कागदपत्र दाखल केली होती.या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये असं निष्पण्ण झालं की, दोघांच लग्न हे खोटं आहे. मुंबई महापालिकेला यासंदर्भात चौकशी करण्याची सूचना दिली आहे. खोटं लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुर्ला पोलिस स्टेशनम मुंबई स्पेशल क्राईम ब्रॅंच २ यांच्याकडे बनावट व्हिसासंदर्भात प्रकरणं येतात. त्यांच्या तक्रारीवर कुर्ला पोलिसांच्या छाणणीमध्ये मलिक यांचे नाव आहे. त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याची माहिती देत मोहित कंबोज यांनी ट्विट करु लिहिले की, दुसरो का फ़र्ज़ीवाड़ा बताने वाले , ख़ुद कितने फ़र्ज़ी हैं !असे म्हणत मलिकांवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com