Naxalism : 'महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगडचे नक्षली आत्मसमर्पण करणार',नक्षलवाद्याकडून सरकारला शांतता चर्चेसाठी आवाहन

Naxalism : 'महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगडचे नक्षली आत्मसमर्पण करणार',नक्षलवाद्याकडून सरकारला शांतता चर्चेसाठी आवाहन

महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड (एमएमसी) स्पेशल झोनल कमिटी आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचा गंभीर दावा एमएमसीचा प्रवक्ता ‘अनंत’ यांनी केला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

माओवादी चळवळीतील मोठे आणि अचानक वळण देणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड (एमएमसी) स्पेशल झोनल कमिटी आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचा गंभीर दावा एमएमसीचा प्रवक्ता ‘अनंत’ यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून माओवादी संघटनांमध्ये सुरू असलेल्या बदलत्या समीकरणांना हा दावा नवे वळण देणारा ठरू शकतो.

मुख्यमंत्र्‍यांच्या नावे जारी केले निवेदन छत्तीसगडमधील एका पत्रकाराला फोनवरून हे निवेदन ऐकवण्यात आले सेंट्रल कमिटी सदस्य सोनूदादा उर्फ भूपतीने आत्मसमर्पणानंतर केले होते माओवाद्यांना आवाहन भूपतीने गडचिरोलीमधून एक व्हिडीओ जारी करून सशस्र संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आता एमएमसी कमिटीही आत्मसमर्पणासाठी तयार असल्याचा दावा प्रवक्ता अनंत याने केला मात्र सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी आम्हाला 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत वेळ द्या, अशी मागणी त्याने केली आहे तोपर्यंत नक्षलविरोधी अभियान थांबविण्याचे आवाहन त्याने तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांना उद्देशून केले

भूपतीच्या आत्मसमर्पणाचा परिणाम?

काही दिवसांपूर्वी माओवादी सेंट्रल कमिटी सदस्य सोनूदादा उर्फ भूपतीने आत्मसमर्पण करून मोठे धक्कादायक पाऊल उचलले होते. गडचिरोलीतून व्हिडिओ जारी करताना भूपतीने “सशस्त्र संघर्ष सोडा, समाजमुखी जीवन जगा” असे माओवादी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.या आवाहनानंतर माओवादी चळवळीत आतून बदल सुरू झाल्याची चर्चा तीव्र झाली होती. त्याचेच प्रतिबिंब आता एमएमसी कमिटीच्या निवेदनात दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com