काँग्रेसचा राष्ट्रवादीला धक्का; 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचा राष्ट्रवादीला धक्का; 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात भावेखल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता भोर तालुक्यातून राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतल अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com