राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; शरद पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. पवारांनी अध्यक्ष राहावे बैठकीत ठराव करण्यात आले आहे. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.