अजित पवार गटाकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती?

अजित पवार गटाकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाच्यावतीने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच नारायण राणे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये आज महाराष्ट्रातील आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या अनुपस्थितीचं कारण समजू शकलेलं नाही तर उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असल्यानं अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com