बातम्या
राहुल कलाटेंच्या बंडखोरीमागे कुणाचा तरी हात - अजित पवार
राज्यात विधान परिषद निवडणूकीनंतर आता आता कसबा-पिंपरी चिंडवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
राज्यात विधान परिषद निवडणूकीनंतर आता आता कसबा-पिंपरी चिंडवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र अखेरी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, राहुल कलाटेंच्या बंडखोरीमागे कुणाचा तरी हात आहे. मतदानाचे विभाजन करण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे. असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.