ताज्या बातम्या
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
थोडक्यात
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
यादीमध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांचा समावेश
राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 17 जानेवारीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेवादीर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.
दिल्ली विधानसभेतील 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.