जितेंद्र आव्हाड यांचा अत्यंत विश्वासू नेता शिंदे गटाच्या वाटेवर?; बॅनर्समुळे चर्चा
Admin

जितेंद्र आव्हाड यांचा अत्यंत विश्वासू नेता शिंदे गटाच्या वाटेवर?; बॅनर्समुळे चर्चा

विरोधी पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विरोधी पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहे. ठाणे महापालिका निवडणुक अगदी जवळ आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशा चर्चा रंगल्या आहेत.

नजीब मुल्ला यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे मुंब्र्यात मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स शिंदे गटाने लावेल असून त्यावर हॅपी बर्थडे नजीब मुल्ला, लिहिले असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामुळे अशा चर्चा रंगल्या आहेत.

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा झटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com