Supriya SuleTeam Lokshahi
ताज्या बातम्या
सुप्रिया सुळेंचे निकवर्तीय सचिन दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सुप्रिया सुळेंचे निकवर्तीय सचिन दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळेंचे निकवर्तीय सचिन दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्ष दोडेक पुणे शहरातील वारजे भागात नगरसेवक आहेत.
आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. ते फिर्यादी यांना शिवीगाळ करु लागले आणि अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. असे आरोप फिर्यादीने केले आहेत.
यावरच वारजे पोलिस ठाण्यात भाजपाचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. या पार्श्वभूमीवर दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.