ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता; 'या' नावांची होतेय चर्चा
विधानसभेचं रिक्त असलेले उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभेचं रिक्त असलेले उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पदासाठी राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
याआधी नरहळी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर आता विधानसभेचं उपाध्यक्षपद हे रिक्त आहे. झिरवाळ हे सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर हे पद रिक्त आहे.
यामुळे आता या पदावर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपद अजित पवार गटाला याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.