Jitendra Awhad
Jitendra Awhad Team Lokshahi

माझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा डाव आखला जातोय - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ तयार केला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आव्हाड यांच्या एका हातात कुराण आहे तर दुसऱ्या हातात भगवद्गीता घेतलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ज्या महिलेच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंद झाला आहे, त्या महिलेला पोलीस रक्षण देत आहेत. माझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. जी गोष्ट मी केलीच नाही येत त्या गोष्टीसाठी मी कधीच गुन्हेगार बनणार नाही. जर कायद्याने हेच होणार असेल तर मी देखील कायदा हातात झाला तयार आहे.

तसेच माझ्याविरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला पोलिसांकडून बळ दिलं जातंय. हे मनाला लागतेय. त्या महिलेवर जो गुन्हा दाखल केलाय. ती उघडपणे फिरत आहे. तरीही पोलीस तिला अटक का करत नाहीये? मी आजपर्यंत हे मनातून निघालं नाही. माझ्या मनातून कधी निघणारही नाही. माझ्या मृत्यूसोबतच माझ्या मनातून ते जाईल. या लढाईत मला कुणाची साथ नकोय. मला देवाने एकट्याने लढायचं बळ दिलं आहे. मी माझी लढाई एकट्यानेच लढणार आहे. मी एवढा दुबळा नाहीये. मी जेवढ्या लढाया लढलो त्यावेळी माझ्यामागे कोण आहे हे पाहिलं नाहीय असे ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

यासोबतच जे मी केलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडीओतून विचारला आहे. ज्या महिलेने माझ्याविरुद्ध 354 गुन्हा नोंद केला ती महिला मुंब्रात येऊन नेत्यांना मंत्र्यांना भेटते. तसेच मंत्रालयात देखील त्यांना भेटायला जाते. 354 सारखा गुन्हा हा माझ्या मनाला लागलेला आहे. माझ्यावर 304 गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असतं, असे म्हणत व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com